खारेपाटण : (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील सामाजिक.सांस्कृतिक, शैक्षणिक आरोग्य ब क्रीडा आदी विविध शेत्रात अग्रेसर असलेल्या खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक नवरात्र उस्तवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
खारेपाटण शिवाजीपेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून यानिमित्ताने सलग ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयी दी.१५ ऑक्टोंबर २०२३ ते दी.२२ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत झुंजार मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दी.१५ रोजी घटस्थापनेदिवशी सकाळी ११.०० वाजता देवीच्या मूर्तीचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शीवराज्यभिषेक सोहळा चित्ररथ देखावा व विठुरायाचा वारकरी संप्रदाय,लेझिम पथक, मराठमोळ्या वेशभूषेतील देव देवता व दिंडीच्या आगमनाने या सोहळ्यात एक रंगत येणार आहे.
तर रोज रात्री सामूहिक गरबा नृत्य होणार आहे.दी.१६/१०/२०२३ रोजी रात्री १०.०० वाजता शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रम दी.१७/१०/२०२३ रोजी रात्री.१०.०० वाजता भव्य ग्रुप डान्स स्पर्धा दी.१८/१०/२०२३रोजी रात्री.१०.०० महिलांसाठी पाककला स्पर्धा दी.१९/१०/२०२३ रोजी रात्री.१०.०० खुल्या झिम्मा फुगडी स्पर्धा तर दी.२०/१०/२०२३ रोजी रात्री १०.०० उखाणे घेणे स्पर्धा. दी.२२/१०/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता होम हवन, दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद दी.२४/१०/२०२३ रोजी रात्री ९.०० वाजता महाआरती तर दी.२५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पारंपरिक पद्धतीने देवीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
झुंजार मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त भरविण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ स्पर्धेची सोडत दसऱ्या दिवशी श्री देव विष्णू मंदिर शिवाजी पेठ खारेपाटण येथे जाहीर होणार असून ज्यांचा लकी नंबर असेल त्यांना मोटारसायकल फ्रिज, वॉशिंग मशीन,एल ई डी टीव्ही, सायकल,मिक्सर आदी विविध अनेक आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तरी नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आव्हान झुंजार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












