देवगड (प्रतिनिधी): देवगडमध्ये आ.नितेश राणेंसमोर झालेल्या राड्यानंतर देवगड तालुक्यातील शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर आमदार वैभव नाईक यांच्यासह देवगड शिवसेना तालुका प्रमुख जयेश अशोक नर , देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर , महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडी , युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे आदींनी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले.
देवगड तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची भेट










