शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग यांचे संघटन कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये आज शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग यांच्यावतीने संघटन कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, तसेच कॉलेज समन्वयक विशाल गुरव आणि अनुभव साथी श्री कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना संघटन कौशल्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षक सुबोध देसाई यांनी केले. या संघटन कौशल्य विषयक मार्गदर्शन शिबिराचा लाभ खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील जवळजवळ २०० विद्यार्थ्यांनी घेतला. विविध ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित हे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

error: Content is protected !!