यावर्षी आंबडोस गावाचा दसरोत्सव नाही; मानकऱ्यानी केले जाहीर

ओरोस (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील आंबडोस गावाचा प्रसिद्ध दसरोत्सव उत्सव यावर्षी होणार नसल्याचे गावच्या मानकरी वर्गाकडून जाहीर करण्यात आले आहे. आंबडोस गावाचा वार्षिक दसरोत्सव प्रसिद्ध आहे. नवमीला मुख्य दसरा व दशमीला अन्य कार्यक्रम, असे या दसऱ्याचे स्वरूप असते. यावर्षी सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी नवमी आहे. तर मंगळवारी २४ रोजी विजयादशमी आहे. त्यामुळे सोमवारी नवमी दिवशी आंबडोस दसरोत्सव होणार होता. पण यावर्षी काही कारणास्तव श्री देव रवळनाथ येथे घट स्थापना होवू शकलेली नाही. त्यामुळे नवमी दिवशी दसरोत्सव आणि दशमी दिवशी होणारे कार्यक्रम होणार नसल्याचे मानकरी वर्गाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांनी याची दखल घ्यावी, तसेच देवाचा मान पुढील वर्षी होणाऱ्या दसरोत्सव कार्यक्रमात द्यावा, असे आवाहन मानकरी दिलीप परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!