मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा – मायकल लोबो

जीवन आनंद संस्थेच्या संवेदना आश्रमचे नवीन जागेत उद्घघाटन

खारेपाटण (प्रतिनिधी): ‘खरा ईश्वर हा देवळात किंवा चर्चमधे नाही तर तो निराधार वंचितांमधे सामावलेला आहे. संदिप परब आणि त्यांचे जीवन आनंद संस्थेतील सर्व सहकारी हे संवेदना आश्रमच्या माध्यमातून ईश्वराची एकप्रकारे सेवाच करीत आहेत.आणि हे खरे पुण्याचे काम म्हणजे मानवतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा होय.’ असे भावपूर्ण उदगार गोवा राज्य विधानसभेचे कळगूंट मतदार संघाचे आमदार मायकल लोबो यांनी म्हापसा येथील संवेदना आश्रमाचे नवीन जागेतील उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना काढले. या कार्यक्रमाला पर्रा ग्रामपंचायत सरपंच चंदू हरमलकर, उपसरपंच डँनिअल लोबो,पंचशितल रेडकर,पंचायत अध्यक्ष दोरवीन लोबो,सारस्वत महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष पाटकर,प्रा.प्रदिप ओसरकर,जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब,विश्वस्त पूनम बुर्ये,जितेंद्र परब हे मान्यवर पदाधिकारी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन आनंद संस्थेचे हितचिंतक असलेले प्राचार्य डाँ.संतोष पाटकर सर,विश्वस्त पूनम बुर्ये यांचेसह संस्थेच्या गोवा व सिंधुदुर्ग मधील टिमने विशेष मेहनत घेतली.जीवन आनंद संस्था ही रस्त्यावरील निराधार व वंचितांच्या पुनर्वसनासाठी गोवा राज्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग,मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्यांतून कार्य करीत आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोवा राज्य कळगुंट विधानसभेचे आमदार श्री मायकल लोबो यांनी वृद्ध व निराधार वंचित बंधावसाठी काम करणाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या सविता आश्रमास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!