ओणी येथे आज आमनेसामने डबलबारी भजन सामना

मसुरे (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील ओणी येथील श्री नवलादेवी मंदिर येथे आज २२ ऑक्टोबर रोजी रात्र नऊ वाजता आमने-सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुवा श्री समीर महाजन(मुणगे, ता देवगड) विरुद्ध बुवा निखिल राणे (जोगेश्वरी मुंबई) यांच्यात हा सामना होणार आहे. बुवा समीर महाजन यांना पखवाज साथ तुषार परब, तबला सुनील बोरकर आणि बुवा निखिल राणे यांना पखवाज साई सावंत आणि तबला सागर राणे साथ करणार आहेत. भजन रसिकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन नवलादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!