वैभववाडी (प्रतिनिधी): मुंबई भर बॅनर व झेंडे लावुन शिंदे गटाने आझाद मैदान येथे होऊ घातलेला दसरा मेळावा भरवला आहे . याबाबत बोलताना, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री संदिप सरवणकर यांनी मार्मिक प्रतिक्रिया देताना म्हंटले की, “धून बोटात असते , गिटारात नाही”. भाड्याची गर्दी आणि खरे दर्दी याची तुलना करता येणार नाही. तरी सुद्धा अमाप पैसा खर्च करून मुंबई भर बॅनर व झेंडे लावून , आपणच बाळासाहेबांचे विचाराचे वारसदार आहोत.किंबहुना पेटंट दार आहोत असा आविर्भाव दाखवणारी मंडळी उद्या काही करतील.पण शिवाजीपार्क च्या गर्दीचा रेकॉर्ड तोडू शकणार नाही. असेही ते पुढे म्हणाले. असे बॅनर गोव्यात लावले होते, ते गोव्यातील लोकांनी टराटरा फाडले .यातून लोक कोणाचे बाजूनी आहेत हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.त्यांनी २०२४ नंतर राजकारण विसरा मेळावा ठेवण्याची गरज येणार आहे, असे ही सरवणकर मिश्कीलपणे म्हणाले.