चिंचवली गुरववाडी येथील सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या स्थानिक विकास निधी मधून मंजूर झालेल्या चिंचवली गुरववाडी येथील सभागृहाचा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी माजी वित्त व बांधकाम समिती सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती रत्नप्रभा वळंजू, खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, चिंचवली माजी सरपंच अनिल पेडणेकर,सौ.रुंजी भालेकर, चिंचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाने आमदार नितेश राणे यांच्याकडे सभागृहासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. आमदार नितेश राणे यांनी तात्काळ आपल्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी या सभागृहासाठी दिला. आज या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाने आयोजित केला होता.

यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे तुलसी वृंदावन देऊन स्वागत करण्यात आले. हा निधी मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार व खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना संदेश सावंत यांनी चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले व आगामी काळात मंडळास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष गुरव, खजिनदार दीपक गुरव,तुकाराम गुरव,कृष्णा गुरव,सुहास गुरव,राजेश गुरव,नितेश गुरव,योगेश गुरव,अमोल गुरव,प्रथमेश गुरव,श्रीकांत भालेकर, रघुवीर भालेकर,भिकाजी सुतार, राजेंद्र भालेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन दीपक गुरव यांनी केले.दरम्यान संदेश सावंत यांनी शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी उ. बा.ठा. सेनेच्या होऊ दे चर्चा या मोहिमेविरोधात उभा केलेल्या बॅनरला भेट दिली आणि बॅनर पाहून शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!