कणकवली (प्रतिनिधी): शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली कॉलेज कणकवली ,जुनिअर कॉलेज एन .एस. एस. विभागातर्फे सायबर क्राईम कसा घडतो. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीचा कार्यक्रम पार पडला. इंटरनेट ,द्वारे डार्क नेट ,कोण वापरतं. आपल्याला येणारे फोन स्मार्ट व्यावसायिक सारखा येतो परंतु आपण स्मार्ट आहे असे वाटते; पण आपण स्मार्ट नसतो त्यामुळेही आपण गुन्ह्यास बळी पडतो. पॅनड्राईव्ह ,सेन्सर ,मिनी कॅमेरा, याच्या साह्याने मदरबोर्ड डॅमेज करण्याचे कार्य होते. आताच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची मोबाईल बद्दलचे असलेली लगट कमी करावी ,कौटुंबिक ,सामाजिक धार्मिक, राष्ट्रीय प्रश्न या वर चर्चा होणे गरजेचे आहे असे मत परफेक्ट कॉम्प्युटरचे संतोष घाडीगावकर सर यांनी मांडले. पी.एस.आय गाडेकर यांनी ‘आपल्याकडून चुकूनही गुन्हे होऊ नयेत आपल्या अवतीभवती गुन्हा होतोय असे वाटल्यास वाटल्यास पोलीस स्टेशनला फोन करून माहिती द्यावी. आम्ही ती माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवू’ असेही सांगितले. पर्यवेक्षक प्रा.ए.पी. चव्हाण यांनी पूर्ण कार्यक्रमाचा सारांश सांगून सर्वांचे आभार मानले . या वेळी प्रा . हरीभाऊ भिसे,प्रा.एस .एस. शिरोडकर प्रा.एस. जी .सावंत, प्रा .व्ही.सी .सावंत ,प्रा .एम .जे कांबळे उपस्थित होते