सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे

योगेश खाडीलकर व अर्पिता फणसळकर यांची सदस्यपदी नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे तर सदस्य म्हणून योगेश खाडीलकर व श्रीमती अर्पिता फणसळकर यांची नियुक्ती शासनाद्वारे करण्यात आली आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या जवळ केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. चार वर्षानंतर या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगामध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष व सदस्य नसल्यामुळे या न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले होते. गेली तीन-चार वर्ष या रत्नागिरी येथील अध्यक्ष व सदस्य काही काळासाठी या जिल्ह्यातील कामकाज चालवण्यासाठी येत होते. अशातच गेल्या सहा महिन्यापूर्वी रत्नागिरीतील याही अध्यक्ष व सदस्यांची मुदत संपल्यामुळे तेही येत नव्हते.त्याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खटल्यांवर होत होता. ग्राहक संरक्षण कामकाजच यामुळे ठप्प झाले होते. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील ग्राहक तक्रारी प्रलंबित राहिल्यामुळे ग्राहकांवर मोठा अन्याय होत होता.तसेच त्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत होता. . ग्राहकांना या व्यतिरिक्त कमी खर्चात व कमी वेळेत न्याय मिळवून देणारी दुसरी यंत्रणाच नाही. अशावेळी ही पद बरीच काळ रिक्त राहिली तर या आयोगावरील विश्वासच ग्राहकांचा उडून जाईल अशा प्रकारची भावना मी आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना भेटून त्यांना याबाबत निवेदन दिले होते. खरं म्हणजे ही बाब एडवोकेट हितेश कुडाळकर यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती . त्यानुसार मी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या निदर्शनास निवेदनाद्वारे आणून दिले. प्रदेश कार्यालयात जनता दरबाराच्या वेळी त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलं आणि त्याचवेळी लवकरात लवकर अध्यक्ष व सदस्य देण्याच आश्वासन दिलं होतं. त्यानुसार चार दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे तर सदस्य म्हणून योगेश खाडीलकर व श्रीमती अर्पिता फणसळकर यांची नियुक्ती शासनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षणाअंतर्गत रखडलेल्या ग्राहकांच्या तक्रारींना आता लवकरच न्याय मिळेल आणि या जिल्ह्याच्या मागणी प्रमाणे जलद अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती केल्याबद्दल माननीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस व जिल्ह्याच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!