पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ …….

वेंगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज बांधवांनी आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये पाहिला

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. या संवादातून देश पातळीवर ज्या ज्या चांगल्या बाबी घडलेल्या असतात त्याबाबत विवेचन करतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या ज्ञानात भर पडते. ह्या वेळचा मन कि बात कार्यक्रम सुतार व शिल्पकार समाजाच्या बांधवांनी पहावा यासाठी भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये आयोजन केले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वकर्मा जयंती च्या निमित्ताने पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. या योजनेमुळे विश्वकर्मांना ओळख व पाठबळ मिळाले आहे. तसेच असंघटित क्षेत्रातील पारंपरिक शिल्पकार व कारागीरांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती साधता येईल. केंद्र सरकारच्या सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे, तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्री.विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ, सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवलेले शरद मेस्त्री, तालुकाध्यक्ष बाबुराव प्रभाकर मेस्त्री, गुंडु वामन मेस्त्री, महादेव व.मेस्त्री, भालचंद्र मेस्त्री, संदीप मेस्त्री, महेश मेस्त्री, भरत मेस्त्री, रघुनाथ मेस्त्री, मंदार ज्ञानेश्वर मेस्त्री, सुधाकर गांवकर, आत्माराम मेस्त्री, अनिल देसाई, सुधीर रा.कावले, सचिन मेस्त्री, दिपक मेस्त्री, कृणाल चोडणकर, शरद पांडुरंग मेस्त्री, संतोष दामोदर मेस्त्री, आनंद दा. मेस्त्री, भाजपा ता. चिटणीस जयंत मोंडकर इत्यादी सुतार शिल्पकार समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!