सावंतवाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाडला कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबियाकडून डॉ.राखी राव यांच्याकडे इन्व्हर्टर भेट सुपूर्द करण्यात आला आहे.
कै.रमाकांत सदाशिव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मळेवाड येथील कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबीयांकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर भेट देण्यात आला आहे.या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राखी राव यांच्याकडे सदरचा इन्व्हर्टर सुपूर्द करण्यात आला आहे.आपले वडील कै. रमाकांत सदाशिव मराठे यांच्या स्मरणार्थ मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रुग्णांचे मुख्य करुन प्रसूती झालेल्या महिलांना व नवजात बालकांना आरोग्य केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जो त्रास होता तो होऊ नये यासाठी आपण आपल्या कुटुंबाकडून आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर भेट देणार असल्याचा शब्द मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला होता.तो शब्द हेमंत मराठे यांनी पूर्ण केला आहे.मराठे कुटुंबियांनी इन्व्हर्टर भेट देऊन रुग्णांची सोय केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी राव व कर्मचारी यांनी मराठे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.यावेळी मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे श्रीप्रसाद मराठे,कमलाकर जोशी,सौ अनुजा जोशी,सौ मधुरा काणे,स्वाती गोगटे,चैतन्य मराठे,कर्मचारी ठाकूर आदी उपस्थित होते.