रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरीत झालेल्या सभेमध्ये एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली हाक….!

आचरा (प्रतिनिधी) : रत्नागिरी मध्ये 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसायिक व पदाधिकारी हजर होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिक्षा चालक-मालक कृती समितीचे पुणे नितीन पवार, तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातील बहुतेक सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक यांनी आपले विचार मांडले व व्यवसायाला येणाऱ्या प्रमुख अडचणी मान्यवरांन समोर मांडले. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. त्यावेळी रिक्षा चालक मालक यांना संबोधित करताना श्री. सुधीर पराडकर यांनी आज मितीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा व राज्यस्तरीय झालेल्या कामांचा आढावा व मार्गदर्शन केले. तसेच कोरोना कालावधीत मुंबईवरून ट्रान्सफर होऊन आलेले रिक्षा परवाना रद्द झाले पाहिजेत, नवीन परवाना बंद झाले पाहिजेत, तसेच आठ वर्षावरील परवाना अट रद्द करून पंधरा वर्षे करण्यात यावी. तसेच आरटीओ ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात दलालांची संख्या वाढलेली आहे. यावर आवाज उठविणे महत्त्वाचे आहे.अशा अनेक विषयांना मार्गदर्शन केले.

तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनला रिक्षा स्टँड मंजूर करणे, त्याचप्रमाणे नोकरीमध्ये,RTA कमिटीची मीटिंग होऊन त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून रिक्षा संबंधित निर्णय घेण्यात यावे. अशी आग्रही मागणी केली. तसेच रिक्षा संघटनेत काम करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम करावे, व रिक्षा संघटनेचा काळा पिवळा झेंडा हाती घ्यावा. असे आव्हान केले. तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या सहमतीने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री प्रताप भाटकर यांची नेमणूक झाल्याचे संतोष नाईक यांनी घोषणा केली. सर्व रिक्षा चालक-मालक यांनी भाटकर यांचे अभिनंदन केले.

तसेच रिक्षा चालक-मालक कृती समितीचे पुणे सरचिटणीस नितीनजी पवार यांनी मार्गदर्शन करताना 2014 सालच्या अहवालाप्रमाणे रिक्षा चालक-मालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी व्हावी असे सांगितले. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना रिक्षाचालकांच्या महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात यावे, असे सुचविण्यात आले.व त्याची अंमलबजावणी व्हावी. त्याचप्रमाणे रिक्षा परवाने ताबडतोब बंद करण्यात यावेत.तसेच CNG कमी दाबाने मिळत असल्यास वजन माप विभागाकडे निवेदन देऊन गॅस मापाची यंत्रणा उपलब्ध करून द्यावी असा आग्रह धरणे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात जिल्ह्यात सर्व रिक्षा चालक मालक यांची परिषद घेऊन जनजागृती करावी. मीटर साठी मीटर ॲप वापरण्याची परवानगी द्यावी. अशा बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा करून तोडगा काढण्यात आला. तसेच लवकरात लवकर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक-मालक यांचा संयुक्त मेळावा रत्नागिरीमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तसेच त्यांचे सहकारी खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी शहर, लांजा, राजापूर या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी मेहनत घेतली व मेळावा यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!