खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जानवली येथील दिक्षा पार्क सोसायटीच्या मागे असलेल्या मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते.त्यामुळे येथील मुलांना खेळताना खूप त्रास सहन करावा लागत होता.ही बाब लक्षात आल्यानंतर दिक्षा पार्क सोसायटीतील ज्येष्ठ सदस्य प्रकाश आंबेरकर यांनी सगळ्यांना हे मैदान श्रमदानातून स्वच्छ करूया व मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊया, तसेच परिसराची स्वच्छता राखून सगळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करूया,असे आवाहन केले.या त्यांच्या भावनिक आवाहनाला सर्वच रहिवाशांनी प्रतिसाद दिला व स्त्रिया पुरुष यांनी हातात झाडू घेऊन मैदान तसेच दिक्षा पार्क सोसायटीच्या परिसराची स्वच्छता केली. आता मैदानाने मोकळा श्वास घेतला असे भावपूर्ण उद्गार याप्रसंगी सर्वच उपस्थित लोकांनी काढले.