जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत यश व पंडित पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑपरेटिव्ह सोसायटी आणि दै.तरुण भारत संवाद यांच्या वतीने आयोजित ‘चांद्रयान ३’ विषयावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेत वय १६ ते ४० या दुसऱ्या गटात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे कलाशिक्षक एम.एस.चोरगे यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा सन -२०२३ चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेचे सहा.शिक्षक पी.बी.पवार यांना प्राप्त झाले बद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे , मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील,एस.बी. शिंदे, एम.एस.चोरगे, पी.बी.पवार तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.













