देवगड (प्रतिनिधी): पडवणे येथील सुनिल जगन्नाथ जाधव(५५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पडवणे धारेचे काटे येथील मांगराचा जवळ असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सुनिल जगन्नाथ जाधव हे अविवाहीत असून ते कायम मुंबईला होते दोन दिवसापुर्वीच मुंबई येथून गावी पडवणे येते आले होते.त्यांना दारूचे व्यसन होते.गावी आल्यानंतर गुरूवारी सायंकाळी जाण्यास निघाले यावेळी त्यांनी त्यांच्या वहिनीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून ते बाहेर पडले.शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास दुध विक्री करण्यास जाणाèया महिलेला धारेचे काटे येथील मांगराचा जवळ असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत ते दिसले.तिने या घटनेची माहिती त्यांचा भावाला दिली.त्यानंतर पोलिस पाटील यांना कल्पना दिल्यावर त्यांनी भाऊ व इतर ग्रामस्थ यांच्यासमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी केली व देवगड पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम, पोलिस हवालदार व्ही.एस्.बिर्जे, पो.कॉ.आचरेकर आदींनी घटनास्थळी जावून गळफास लावलेल्या स्थितीत असलेला मृतदेह काढून पंचनामा केला.या घटनेची खबर पुतणे दिपक गुरूनाथ जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहे.