दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग ११ व्या वर्षी, प्रतिवर्षाप्रमाणे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात, उगवाई च्या कोंडीवर वसलेल्या, आणि एका रात्रीत बांधकाम करून उभारलेल्या, ऐतिहासिक श्री देव वाघोबा मंदिरामध्ये, शनिवार तारीख २६ एप्रिल २५ रोजी श्री सत्यनारायण पूजा अन् धार्मिक कार्यक्रम सह भजनाचा उपक्रम आयोजित केला आहे. गावच्या पंचायतनामध्ये श्री वाघोबा मंदिराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.माहेरवाशीणींचा देव म्हणून अनेक दाखले आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
अशा निसर्गरम्य निवांत स्थळी श्री देव वाघोबा क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ, फोंडाघाट- गांगोवाडी तर्फे दरवर्षी श्री सत्यनारायण पूजा असंख्य भावीका च्या, सासुरवाशींनीच्या, माहेरवाशिणींच्या उपस्थितीत संपन्न होतो. यावेळी सकाळी आठ वाजता, श्री देव वाघोबा पूजन, गणेश पूजन ,श्री सत्यनारायण पूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद इत्यादी दुपारी तीन वाजता- महिलांसाठी मंडळाच्या महिला विभागाकडून हळदीकुंकू ! संध्याकाळीच साडेतीन वाजता गुरुदास प्रासादिक भजन मंडळ- फोंडाघाट, गडगे सकल.( लकुळ गोसावी ) त्यानंतर औदुंबर प्रासादिक भजन मंडळ फोंडा- बोकडभाटले (भरत मोरे ) यांची सुस्वर भजने ! सायंकाळी सहा वाजता हरिपाठ व महाआरती. रात्री आठ नंतर ज्ञानेश्वरी भजन मंडळ बुजवडे – राधानगरी यांचे संगीत भजन ! रात्री १०:३० वाजता लवू सावंत यांच्या मांडदेव प्रासादिक भजन मंडळ मोहुळ यांचे दिंडी भजन आणि त्यानंतर स्थानिक भजने असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. याचा दशक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.












