वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी करूळ चेक नाक्या लगतच्या वळणावर दोन कार मध्ये अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळतच करूळ पोलीस चेक नाक्यावरील पोलिसांनी धाव घेतली. व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत त्यामुळे महामार्गावरील रहदारी खुप वाढली आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे वळणावर समोरील वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.













