शेकडो गाड्या थांबून पर्यटकांना विनंती
कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गातील स्वच्छता प्रेमींनी एकत्र येत स्वच्छतेचा एल्गार केला.400 पेक्षा अधिक पर्यटकांच्या गाड्यांना थांबवून पर्यटकांना प्लास्टिक कचरा सिंधुदुर्गचे रस्त्यावर टाकू नका अशी विनंती केली. या स्वच्छता मिशनमध्ये जिल्ह्यातील पत्रकार व विविध अधिकारी आणि मुंबई गोवा महामार्गावरील ग्रामपंचायतींचे सरपंच,विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी साडेनऊ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असल्यामुळे संविधाना प्रति सन्मान व्यक्त करण्यात आला.तसेच 26 /11 च्या मुंबईवरील हल्ल्यातील शहीद पोलिसांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने मोहिमेला सुरुवात झाली. पत्रकार गणेश जेठे यांनी या मोहिमेचा उद्देश सांगितला.सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, हायवे पोलीस निरीक्षक आर आर गोसावी, ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम, कसाल सरपंच राजन परब ,वागदे सरपंच संदीप सावंत, बेळणे सरपंच गिरकर ,अभियंता विनायक जोशी, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुरये,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, विनसम मंडळ वागदे चे अध्यक्ष अनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया ा टेंबकर ,सरिता राऊत, पोलीस आर एस ठाकूर, एस पी गावित, एस वाय सावंत, कुंदे माजी सरपंच सचिन कदम,विवेक ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते एनपी मटकर ,गणेश पारकर, रुद्र कदम कोंडये माजी सरपंच अनिल मेस्त्री,तुषार नेवरेकर पत्रकार बाळ खडपकर, संदीप गावडे, दत्तात्रय मारकड,गिरीश परब, मोहन पडवळ ,विनायक गावडे, विनोद परब, दत्तात्रय मारकड, विराज गावडे ,सुधीर जोशी, हेमंत वारंग,गिरीश गावडे, सुयोग कदम, विराज गोसावी, विवेक परब ,किशोर पाताडे, रुजाय फर्नांडिस, महेश सरनाईक व अशोक करंबलेकर मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग वासिय सहभागी झाले होते.
गणेश जेठे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला प्लास्टिक कचरा टाकू नये यासाठी ही विनंती करणारी मोहीम असल्याचे सांगितले. त्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ जिल्हा म्हणून संपूर्ण देशभरात नावलौकिक होईल व इथला पर्यटन व्यवसाय वाढेल या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचे सांगितले.कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी ही मोहीम अतिशय स्तुत्य असून रस्त्याच्या कडेला प्लास्टिक कचरा हा गंभीर प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करू असे आवाहन केले. द्वारकानाथ गुर्ये यांनी आपल्या जिल्ह्यात लवकरच नौसेना दिन साजरा होत आहे त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून जिल्ह्यातील लोकांनी रस्त्याच्या कडेला प्लास्टिक टाकू नये असे आवाहन केले.
दोन तास ही मोहीम राबवण्यात आली. 400 पेक्षा अधिक वाहने थांबून त्यांना आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे पर्यटक या उपक्रमावर बेहद खुश होते .अनेक पर्यटकांनी तुम्ही करत असलेले काम खूप स्तुत्य आहे असे स्वच्छता प्रेमींना सांगितले. अनेक पर्यटकांनी हात जोडून उपक्रमाचे कौतुक केले. तर अनेक पर्यटकांनी टाळ्या वाजवून स्वच्छता प्रेमींना दाद दिली. अनेकांनी तर आम्ही रस्त्यावर कधीही कचरा टाकणार नाही असा जणू शब्द स्वच्छता प्रेमींना दिला. शेवटी सगळ्यांचे आभार मानून उपक्रमाची सांगता झाली चहापाणी व अल्पोपहार व्यवस्था सरपंच राजन परब व हायवे पोलीसानी केली. तसेच सर्व स्वच्छता प्रेमींना टोप्या गिरीश परब यांनी पुरवल्या.












