“आभाळमाया” ग्रुपने गाठला सलग तिसऱ्या वर्षी २०० रक्तदात्यांचा पल्ला

तब्बल २१६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद

चौके (अमोल गोसावी) : सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या स्मृती प्रित्यर्थ आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २१६ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात २१ महिलांचा सहभाग होता.

या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगरपालिका सहायक अधिकारी (उद्यान विभाग) जयंत जावडेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब, उद्योजक आणि भाजप युवा नेते आनंद उर्फ भाई सावंत, मनसे कुडाळ तालूकाप्रमुख हेमंत जाधव, मनसे जिल्हासचिव बाळा पावसकर, उद्योजक रूपेश पावसकर, मालवण नगरसेवक मंदार केणी, मनसे मालवण तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे, माजी नगरसेवक गणेश कुशे, मालवण येथील प्रसिद्ध हॉटेल बांबूचे मालक संजय गावडे, भाजप तालुका समन्वयक विजय केनवडेकर, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, वराड सरपंच शलाका रावले, कुणकवळे सरपंच मंदार वराडकर, आंबेरी गावचे सरपंच मनोज डीचोलकर, समाजसेवक सुनील नाईक, स्मिता कंप्यूटर इंस्टिट्यूटच्या संचालिका श्रद्धा नाईक मॅडम, वराड उपसरपंच गोपाळ परब, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, ऍड. हृदयनाथ चव्हाण, ऍड.अक्षया वराडकर, शिवसेना महिला आघाडीप्रमुख श्वेता सावंत, भाजप वराड शक्तीकेंद्रप्रमुख राजन माणगांवकर, माजी सरपंच बबन मिठबावकर, पत्रकार कुणाल मांजरेकर, पत्रकार अमोल गोसावी, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक प्रदीप देऊलकर, हॉटेल घर मिठबावकरचे मालक मिथिलेश मिठबावकर, कोरोना योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेले राजेश पारधी, वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक, शाळेचे उपाध्यक्ष आणि कुणकावळे विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि समाजसेवक आनंद वराडकर, जिल्हा बँक अधिकारी देवानंद लोकेगांवकर, बाबा गावडे, समाजसेवक विद्याधर चिंदरकर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जयंत जावडेकर आणि इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. आलेल्या मान्यवरांचे स्वागत ट्रस्टचे सचिव श्री.देवेन उर्फ पप्पू ढोलम यांनी केले.

यावेळी आपल्या कलेने कट्टा पंचक्रोशीचे नाव सातासमुद्रापार घेऊन गेलेले वराडकर हायस्कूल कट्टाचे कला शिक्षक समीर चांदरकर सर यांना यावर्षी सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच मागील वर्षी ज्यांनी अत्यंत तातडीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले अशा रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. गोवा राज्यात जेव्हा रुग्णांना रक्ताची गरज भासते अशावेळी गोवा येथे कार्ड हॉस्पिटलमधे पोच करणारे ग्रुप सदस्य श्रीकांत चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रुप सदस्य समाजसेवक छोटू ढोलम, उद्योजक समीर रावले, पोलिस नाईक नितीन शेट्ये, जी.एच.फिटनेसचे सर्वेसर्वा गौरव हिर्लेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सागर चव्हाण, पायल चव्हाण, राणी डगरे, पूजा डगरे, ऍड.प्रदीप मिठबावकर, उद्योजक प्रवीण मिठबावकर, डॉ.प्रथमेश वालावलकर, राहुल डगरे, शुभम मसुरेकर, परमानंद वेंगुर्लेकर गुरुजी, संतोष परब गुरुजी, पॅरी आंबेरकर, भाई वेंगुर्लेकर, युवराज ढोलम, अमित चव्हाण, जगदीश परब, वसंत वराडकर, प्रणित चव्हाण, मनोज चांदगावकर, हितेश पडते, अक्षय यादव, जय वेंगुर्लेकर, शिवा शिरोडकर, अभिषेक रावले, रूपेश वाडेकर, तेजस म्हाडगुत, विकी गावडे, अवधूत चव्हाण, देवदास ढोलम, चेतन वराडकर यांनी प्रयत्न केले तसेच स्मिता कंप्यूटर इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री.जयंद्रथ परब यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमास रंगत आणली. आलेल्या रक्तदात्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून मदत केली किंवा शुभेच्छा दिल्या अशा सर्वांचे आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!