सिंधुदुर्ग मधील संगीत व पखवाज अलंकारांनी जिंकली कर्नाटकातील रसिकांची मने

तब्बल 75 पखवाज, 4 तबला, 3 ढोलकीपटूंनी सादर केला संगीतमय भजनारंग

चौके (अमोल गोसावी) : उडूपी, कर्नाटक, मणिपाल येथील श्री देव उमा माहेश्वरी मंदिर येथे महेश ठाकूर यांच्या सौजन्याने तसेच उडूपी श्रीकृष्ण मंदिर येथे उमेश मेस्ता आणि कुमार मेस्ता यांच्या वतीने सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी डॉ.दादा परब आणि भजनसम्राट बुवा भालचंद्र केळूसकर संचलित जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत (कुडाळ-सिंधुदुर्ग) यांनी आपल्या साथीदार आणि 75 पखवाज,4 तबला,3 ढोलकी जुगलबंदी विद्यार्थी वर्गासह तसेच संगीतमय भजनारंग सादर करुन कर्नाटक उडूपी येथील संगीत रसिकांची मने जिंकली व ऊत्तर हिंदुस्थानी संगीताचे सादरीकरण दक्षिण हिंदुस्थान मध्ये करुन संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात लावला याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यामध्ये पखवाज अलंकार यांच्या नेतृत्वात संगीत अलंकार गायक प्रफुल्ल रेवंडकर, युवा गायक व हार्मोनियम वादक अमित उमळकर, तसेंच विद्यालयाचे पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर,सचिन कातवणकर, कु.ओमकार वेंगुर्लेकर व तबला वादक अतुल उमळकर, कु.साईश उमळकर, कु.सुरज पालव, कु.शुभम पिंगुळकर तसेच 75 पखवाज वादक विदयार्थी कलाकार यांनी सहभाग घेतला, या संगीत सोहळ्याचे निवेदन अक्षय सातार्डेकर यांनी आपल्या खास हिंदी बोलीत व हटके शैलीत केले. यावेळी आकाश फिश मिल, खवणे तसेच उमा महेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि रागतरंगा संस्था, शिरूरू, उडूपी यांजकडून सर्व कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, साऊंड व्यवस्था आर.पी.साऊंड चे कु.ओमकार वेंगुर्लेकर यांनी उत्तम दिली, तर छायाचित्रण श्री प्रमोद कळंगुटकर यांनी केले, तसेच नाथा मडवळ माजी सरपंच म्हापण,सुशांत बांदेकर,उमेश मेस्ता,कुमार मेस्ता तसेच सर्व पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्र परिवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्याबद्दल महेश विठ्ठल सावंत यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.

error: Content is protected !!