डीन, सी एस यांना समन्वय राखून काम करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

ओराेस (प्रतिनिधी) : शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन आणि जिल्हा रुग्णालय सी एस यांच्यात पटत नसल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढले जात आहे. तुम्हाला लागणारा निधी आम्ही जिल्हा नियोजन मधून देण्यास तयार आहोत. तरीही तुम्ही उपाय सुचवित नाहीत. केवळ एकमेकांची नावे सांगण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्येक रुग्णाला तुम्ही रेफर करीत आहात. जिल्हाधिकारी यांच्यावर येथे उपचार होत नसतील तर सर्वसामान्यांवर उपचार कसे होणार ? असा प्रश्न करीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना समन्वय राखून काम करण्याच्या सूचना देतानाच उपलब्ध असलेल्या मशनरी वापरात येण्यासाठी लागणारे टेक्निशियन जिल्हा नियोजन मधून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यासाठी १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश दिले.

जिल्हा रुग्णालयातील दुरावस्थेबाबत तसेच शासकीय मेडिकल कॉलेज डीन यांच्या मनमानी बाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी शासकीय मेडिकल कॉलेजच्या सभागृहात बैठक घेतला. यावेळी भाजप नेते निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, डीन डॉ सुनीता शिवानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शाम पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी औषध साठा उपलब्धते पासून आढावा घ्यायला सुरू केले. यावेळी सी एस डॉ पाटील महत्त्वाच्या औषधांची खरेदी करण्यात आली आहे, असे सांगितले. त्यानंतर आपल्याकडे कोणत्या मशनरी आहेत पण टेक्निशियन नाही, याची माहिती विचारली. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश मशनरीला टेक्निशियन नसल्याचे यावेळी पुढे आले.

error: Content is protected !!