मसुरे (प्रतिनिधी) : बागायत पुला नजीक वीज वितरण कंपनीचा वीज खांब मागील आठवडा भर वाकलेल्या अवस्थेत असून रहदारीच्या मार्गावर वीज पोल, वीज वाहिन्या तुटून पडल्यास जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.वीज वितरणच्या अधिकारी वर्गाने त्वरित दखल घेऊन सदर वीज पोल त्वरित बदलण्याची मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.
मागील आठवड्यात बागायत माळगाव पंचक्रोशीती झालेल्या वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वीजवितरणच्या विरण उपकेंद्रातुन आलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांवर बागायत परीसरात मोठी झाडे उन्मळून पडली व हजारो ग्राहकांचा विजपुरवठा खंडीत झाला.त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा रात्री पूर्ववत केला होता.
गावकऱ्यांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरुपात उभे केले पोलचे स्ट्रक्चर हे अंत्यंत धोकादायक आहे.त्यावर उच्च दाबाच्या वीज वाहिन्या आहेत व खाली बेळणे आंगणेवाडी मालवण महामार्ग आहे.बाजुच्या परीसरात मैदानावर संपूर्ण वायर तुटुन खाली पडलेल्या अवस्थेत आहेत व मैदानावरील पोल धोकादायक रीत्या झुकलेला आहे.वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉक लागुन किंवा झुकलेला पोलमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तातडीने सदर वीज पोल बदलून वीज वाहिन्या निर्धोक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.












