नौसेना दिन साजरा करण्यासाठी पिडब्ल्यूडीने घेतलेल्या मेहनती चा केला सन्मान
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : भारतीय नौसेना दिन मालवण तारकर्ली मध्ये साजरा झाला. नौसेना दिन ची जय्यत तयारी केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवण येथील उपअभियंता अजित पाटील यांचा नौदल ऍडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते कमेंडेशन मेडल प्रदान करून सन्मान करण्यात आला. नेव्ही डे च्या दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबर रोजी चीफ ऑफ दि नेव्हल स्टाफ ऍडमिरल आर हरीकुमार यांनी विशेष समारंभात उपअभियंता अजित पाटील यांना नेव्ही कडून कमेंडेशन मेडल अर्थात प्रशंसा मेडल प्रदान करून सन्मान केला.जगात चौथ्या क्रमांकाची बलाढ्य जलसेना म्हणून दबदबा असलेल्या भारतीय नौदलाकडून माझा झालेला सन्मान हा माझ्या सिव्हिल सर्व्हिस मधील आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे. पिडब्ल्यूडी मधील माझे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा बहुमान मिळाला.हा सन्मान माझ्या पिडब्ल्यूडी खात्याचा सन्मान आहे. रस्ते व बांधकाम विभागाचे सचिव श्री. साळुंखे, मुख्य अभियंता श्री. शरद राजभोज, अधिक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, कार्यकारी अभियंता श्री. अजयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कनिष्ठ अभियंता तुषार एरंडे, पल्लवी मनसुख व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे निर्धारित वेळेत नेव्ही डे च्या अनुषंगाने पिडब्ल्यूडी विभागाची जबाबदारी पार पाडू शकल्याची प्रतिक्रिया उपअभियंता अजित पाटील यांनी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज शी बोलताना दिली.आहे. नौदल तळापासून दूर प्रथमच यावर्षी इंडियन नेव्ही ने नेव्ही डे मालवण तारकर्ली मध्ये साजरा केला. दीड महिन्यांच्या अत्यंत कमी वेळेत पिडब्ल्यूडी खात्याकडून अत्यंत दर्जेदार अशी तयारी नेव्ही डे साठी करण्यात आली. नेव्ही कडून छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा राजकोट गडावर उभारण्यात आला. यानिमित्ताने राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण , सुशोभीकरण पिडब्ल्यूडी कडून करण्यात आले. मालवण मधील रस्ते नूतनीकरण, शासकीय इमारतींचे सुशोभीकरण, पंतप्रधानांचे व अति महनीय व्यक्तींच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड उभारणी, पार्किंग, बॅरिकेट्स आदी कामांमुळे नेव्ही डे साजरा करताना नौदलाला मदत झाली.याबद्दल पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन