खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये अंमली पदार्थ विरोधी जाणीव जागृती शिबिर नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्त्या म्हणून आरोग्य सहायिका श्रीमती घुगरदरे मॅडम उपस्थित होत्या. या शिबिरादरम्यान प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पर्यवेक्षक संतोष राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वडाम मॅडम उपस्थित होत्या.आरोग्य सहायिका घुगरदरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्या विळख्यामध्ये न अडकण्यासंदर्भातील काळजी कशी घ्यावी याविषयी मुलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक महादेव मोठे यांनी केले.













