खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये 6 डिसेंबर 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खारेपाटण. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी. कांबळे व खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यानी पुष्पहार अर्पण केला. यावेळेस विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहली.या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आत्माराम कांबळे, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव मोटे यांनी केले, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा परिचय ही करून दिला.













