खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली न्यायालयात नुकतेच राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घघाटन कणकवली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायधीश (क.स्तर ) कणकवली चे प्रमुख टी एच शेख व सहदिवाणी न्यायधीश (क.स्तर) एम बी सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये दोन्ही न्यायालयातील प्रलबित ९ दिवाणी,२७ फोजदारी,२२ ई – चलन व १२३ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली.यावेळी फौजादरी व ई – चलन कडील वसूली रक्कम २१३५००/- तसेच राष्ट्रीयकृत बँका,ग्रामपंचायत, म.रा.वि.वि कंपनी यांनी वसुलीसाठी दाखल केलेल्या वादपूर्व प्रकरणांपैकी १२३ प्रकरणे निकाली करून सुमारे ७३०९२३/- रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
या कार्यक्रमाला कणकवली वकील संघटनेचे सदस्य बरगे, सहा. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कणकवली प्रमोद ठाकूर,कृषी अधिकारी पंचायत समिती कणकवली व कणकवली न्यायालयाचे कर्मचारी एस पी सावंत,सहा.अधीक्षक (प्रशा.), एस पी जाधव,सहा. अधीक्षक (वित्त.), कुडाळकर, लघुलेखक एस एस जाधव व लिपिक आचार्य, वाळके, तोरसकर, कांबळे, शेलटकर, लोबो,कनिष्ठ लिपिक जाधव व बामणे यांचे सहकार्य लाभले.













