युवा सेना चषका चा ” मानकरी ठरला अणसुरे,राजापूर संघ तर उपविजेता कोंडवाडी खारेपाटण संघ

तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण गाव मर्यादित भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी.अनसुरे,राजापूर हा संघ “युवा सेना चषकाचा” मानकरी ठरला.या संघाला रोख रुपये २५०००/- व आकर्षक चषक तर श्री गणेशकृपा कोंडवाडी खारेपाटण. हा संघ स्पर्धेचा उपविजेता ठरला.या संघाला रोख रुपये १५०००/- रुपये व आकर्षक चषक शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित व त्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मैदानावर सलग तीन दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर श्री सरवणकर, वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे,खारेपाटण विभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, विरेंद्र चिके, खारेपाटण ग्रा.प सदस्य गुरूप्रसाद शिंदे,मधुकर वळंजू, मंडळाचे अध्यक्ष युवा सेनेचे कार्यकर्ते तेजस राऊत, अनंत गांधी, दिगंबर राऊत, माजी ग्रा.प सदस्य शंकर राऊत,प्रज्योत मोहिरे आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तेजस राऊत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण मर्यादित १२ संघांनी प्रवेश घेतला होता. दीं.११,१२ व १३ फेब्रुवारी २०२३ अशी सलग तीन दिवस ही स्पर्धा खारेपाटण प्रीमियर लीग म्हणून खेळविण्यात आली. या स्पर्धेतील उत्कृष्ट शेत्ररशक म्हणून नरेंद्र खांडेकर व उत्कृष्ट फलंदाज म्हण राजा राऊत या कोंडवाडी खारेपाटण या संघाच्या दोन खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आला. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनसुरे राजापूर संघाचा खेळाडू आशिष मालवणकर व मलिवीर म्हणून याच संघाचा खेळाडू किशोर कनेरकर यांचा आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

युवा सेना चषक – २०२३ ही क्रिकेट स्पर्धा दोन गटात खेळविण्यात आली होती.यामध्ये गाव मर्यादित एक गट व खारेपाटण वाडी मर्यादित एक गट अशा स्वरूपात खेळविण्यात आली.

युवा सेना खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण विभागात अशा प्रकारची पक्ष विरहित क्रिकेट स्पर्धा भरवून तळागाळातील खेळाडूंना क्रिकेटची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तेजस राऊत युवा मित्र मंडळाचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने कौतुक केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी सतीश सावंत,संजय पडते यांनी आपले मनोगत व्यक्त करत खेळाडूंचे अभिनंदन केले.यावेळी मंडळाच्या वतीने युवा सेना कार्यकर्ते तेजस राऊत यांच्या शुभहस्ते खासदार विनायक राऊत यांचे शाल श्रीफळ व पुषपगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार संतोष लोकरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!