संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.७ व ८ डिसेंबर २०२३ रोजी यशवंत चव्हाण माध्यमिक विद्यालय अचिर्णे येथे संपन्न झाले. सदरच्या विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती, निबंध व वक्तृत्व या सर्व स्पर्धांमध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. प्रतिकृती तयार करण्यामध्ये प्राथमिक गटात कु.चिन्मय दशरथ शिंगारे, कु.सिद्धेश सुनील भंडारी यांच्या ‘सिलेंडर इन्क्लायनर’ या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तर निबंध स्पर्ध शिवानी रत्नाकर फुटक व वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी विश्वनाथ चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शिक्षक भोसले एस.व्ही., सबनीस एस.ए., चोरगे एम एस या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक नादकर सर, पर्यवेक्षक पाटील पी.एम., शिंदे एस बी, माध्यमिक विभाग प्रमुख पाटील एस.एस. आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












