दुसऱ्याला हरवण्यासाठी न खेळता स्वतः जिंकण्यासाठी खेळा – सविता परब

आंबेरी केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धांचा दिमाखात शुभारंभ

चौके ( अमोल गोसावी ) : ” आपण दुसऱ्याला हरवण्यासाठी न खेळता स्वतः जिंकण्याच्या उद्देशाने खेळा. अपयश आले तर नाराज होऊ नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. नियमित सरावावर कोणतेही यश अवलंबून असते. प्रयत्न केलात तर यश निश्चितच मिळते. प्रत्येकाने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करून ही क्रिडास्पर्धा यशस्वी करावी.” असे प्रतिपादन कट्टा प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सविता परब यांनी आंबेरी केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काळसे येथे बोलताना केले. आंबेरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ काळसे हायस्कूलच्या क्रिडांगणावर आज सकाळी काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी सभापती राजेंद्र परब , कट्टा प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सविता परब , विषयतजज्ञ सौ. गौरी नार्वेकर , गटसाधन केंद्र मालवण विशेष तज्ञ स्वप्निल पाटणे , केंद्र मुख्याध्यापक धानजी चव्हाण , पराड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश आवळेगावकर , धामापूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद परब , काळसे नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेश्मा प्रभु , काळसे धामापूरच्या शा. व्य. समिती अध्यक्षा स्वप्नाली गोसावी, आरोग्य सेवक गणेश जाधव , आरोग्य सेविका गौरी कसालकर आणि आंबेरी केंद्रातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आंबेरी केंद्रातील ११ प्राथमिक शाळांतील सुमारे १०० मुलांमुलींनी सहभाग घेतला आहे. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी व राजेंद्र परब यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेरी केंद्रातील दिपक गोसावी , स्वरा शिंदे , रामचंद्र कदम , महेश जिकमडे , सुकन्या गंगावणे , लक्ष्मण आकेरकर , लक्ष्मी काळसेकर , कृष्णा कालकुंद्रीकर , मिलन जाधव , भागवत अवचार , मनिषा ठाकूर , गायत्री गिरकर , या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!