चौके ( प्रतिनिधी ) : काळसे गोसावीवाडी येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनकर हरी गोसावी ( वय ९० ) यांचे शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे , दोन मुली सुना जावई नातवंडे असा परीवार आहे. काळसे येथील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी , आणि गणेशमुर्तीकार सतिश उर्फ बाळू गोसावी यांचे ते काका होते. तसेच माध्यमिक शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक पूजा आनंद गोसावी यांचे ते वडील तर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे सेवानिवृत्त असिस्टंट मॅनेजर आनंद गोसावी यांचे ते सासरे होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनकर गोसावी यांचे निधन












