आचरा (प्रतिनिधी) : भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून भाजपा वेंगुर्ले कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना(बाळू) देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर गावडे व नितीन चव्हाण, नगरसेवक प्रशांत आपटे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, युवा मोर्चाचे मारुती दोडशानट्टी, बुथप्रमुख शेखर काणेकर, अर्जुन तांडेल, संदिप देसाई, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री उपस्थित होते.