देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील पंकज पेडणेकर यांची मुक्ताई नाैका साेमवारी पहाटे 4.30 वा.सुमारास बंदरात आल्यानंतर खलाशी अनंत तुकारात तांबे(37, रा.भुगांव ता.लांजा, रत्नागिरी) यांनी नाैकेवरील तांडेल व इतर तीन खलाशी यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी तांडेल रणजीत बबन डाेर्लेकर(45,रा.आंबेरी रत्नागिरी) यांनी त्याला समजावले मात्र त्यांनी शिवीगाळी करून स्वत:चेच डाेके बाेटीवरील दरवाजाच्या काचेवर आपटून स्वत:स दुखापत करून घेतली व बाेटीवरील बर्फ फोडण्याचा लाेखंडी भाला हातात घेवून बाेटीवरील तांडेल व खलाशी यांना जीवे ठार मारण्याचा इराद्याने मारून त्यांना लहान माेठ्या गंभीर दुखापती केल्या. या घटनेनंतर खलाशी तांबे यांनी बाेटीवरील जाळ्यांना पेटवून बाेटीला आग लावून दिली हाेती तर त्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये तांडेल रणजीत डाेर्लेकर यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी गाेवा बांबूळी येथे नेण्यात आले हाेते मात्र त्याची प्रकृती ही चिंताजनक हाेती अशा स्थितीत साेमवारी रात्री त्याचे निधन झाले. तर दुसरा जखमी खलाशी शशिकांत तुकारा पतयाने(60) या खलाशालाही गंभीर दुखापत झाल्याने ताे ओराेस जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे.