राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभिषेक बाल विद्यालय, कासार्डेच्या कु.शर्वील मारकडचे घवघवीत यश

तळेरे (प्रतिनिधी): कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या ‘खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स कोल्हापूर’ या आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभिषेक बाल विद्यालय कासार्डे शाळेतील सिनियर केजी मधील विद्यार्थी कु. शर्विल दत्तात्रय मारकड यांने ५ ते ६ वयोगटातून खेळताना कुमिते प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. यास्पर्धेला १ हजारपेक्षा अधिक खेळाडुंनी सहभाग दर्शविला होता. या क्रीडा कुंभमेळ्याचे उद्घाटन खास.धनंजय महाडिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी खास.अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार अमल महाडिक,भगिरथ महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूंधती महाडिक,वैष्णवी महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक,कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित निकम, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रूपाराणी महाडिक व इतर मान्यवर उपस्थित झाला. उपविजेत्या कु.शर्वील मारकडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रौप्यपदक देऊन गुणगौरव करण्यात आला. कु.शर्वील मारकड हा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनच्या कासार्डे शाखेत दोन वर्षांपासून सराव करीत आहे. या यशस्वी खेळाडूचे ज्ञानशशी लीलावती एज्युकेशन ट्रस्ट,कासार्डे संस्थेचे अध्यक्ष भास्कर नादकर व उपाध्यक्ष देवेंद्र देवरुखकर,विद्यालयाच्या शिक्षिका व संस्था खजिनदार भाग्यश्री नादकर,अभिषेक बाल विद्यालय कासार्डेच्या प्राचार्या सरीता देवरुखकर यांनी कु.शर्वील मारकडला त्याच्या घवघवीत यशाबद्दल गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल शर्वील मारकडचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!