देवगड (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड आयोजित “श्री दत्त जयंती उत्सव ” २६ डिसेंबर २०२४ ला साजरा करण्यात येणार असून आपण सहकुटुंब स्वामी मित्रपरिवार भक्ती भावानी उपस्थित राहून स्वामी महाराजांच्या आशीर्वाद व तीर्थप्रसाद चा अवश्य लाभ घ्यावा . असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ हडपिड यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ७ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होम हवन ९ ते ११ लघु रुद्र,
11 ते 12 पालखी, सोहळा दुपारी १२:१५ वाजता महाआरती, दुपारी १ते ३ तीर्थप्रसाद, ३ ते ४ अक्कलकोट यात्रा भाग्यवंत सोडत, ४ ते ७ नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता पंचम ग्रुप प्रस्तुत अभंग गाथा भाव भक्ती गीत सुरेल मैफिल सादर करते प्रसाद जाखी तरी सदर कार्यक्रमास सहकुटुंब स्वामीभक्त मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आव्हान अक्कलकोट भुषण स्वामीरत्न पुरस्कार सन्मानीत संस्थापक सचिव नंदकुमार तुकाराम पेडणेकर व संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे आणी स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई,श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड गाव समीती यांनी आव्हान केले आहे.