चिंदर सेवा संघाचे जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजन
रक्ताचे पुण्यदान करा-प्रकाश मेस्री. भाई तावडे यांचे आवाहन
आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर येथील चिंदर सेवा संघ प्रतिवर्षी आई भगवती माऊली यात्रा व श्री दत्त जयंती उत्सव यांचे औचित्य साधून जिल्हा रक्त पेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते. यावर्षी चिंदर सेवा संघाचे दिवंगत अध्यक्ष कै संदिपभाई पारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुवार 28 डिसेंबर रोजी श्री भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे सकाळी 9 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्य दान करावे असे आवाहन चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्री, सल्लागार भाई तावडे यांनी केले आहे. रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी, प्रकाश मेस्री-(अध्यक्ष) 8554058227, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे-7507000599, संतोष अपराज-9423304017, सिध्देश गोलतकर-7798748897, निशांत पारकर-9049052532 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन चिंदर सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.