आचरा (प्रतिनिधी): रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३०वाजता देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षाखालील आचरा मर्यादित शालेय गट आणि १४ वर्षावरील जिल्हास्तरीय अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे. शालेय गटात प्रथम १००१रु, द्वितीय ७०१रु, तृतीय ५०१रु तर उत्तेजनार्थ तीन प्रत्येकी २०१रु, द्वितीय गटात प्रथम ३००१रु, द्वितीय २५०१रु, तृतीय १५०१रु तर उत्तेजनार्थ तीन प्रत्येकी ५०१रु .सदर स्पर्धा वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा, कै श्रीकांत सांबारी यांच्या स्मरणार्थ श्रीमती वैशाली सांबारी, तसेच सदाशिव कृष्णाजी जोशी, कै शारदा सदाशिव जोशी यांच्या स्मरणार्थ अभिजित जोशी यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक गटात प्रथम येणाऱ्या सहा संघांना प्रवेश दिला जाणार आहे.नाव नोंदणी साठी अंतिम तारीख २३ जानेवारी असून अधिक माहिती साठी सकाळी १० ते ४ या वेळेत ०२३६५ २४६०१७ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.