निराधार जखमी जीवन जगत असलेल्या जिग्नेश ला जीवन आनंद संस्थेने दिला आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : ठाणे कोर्ट नाका फुटपाथवर गेल्या एक महिन्यापासून जखमी अवस्थेत निराधार जीवन जगत असलेल्या जिग्नेश वय – ५५ या व्यतीला निराधार व्यक्तीसाठी काम करनाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन नुकतेच त्याला समर्थ आश्रम विरार येथे दाखल करून घेतले.जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव श्री किसन चौरे यांसह भाईदास माळी, गोविंद मार्गी,तसेच श्री गावडे काका ह्यांनी ठाणे कोर्ट नाका येथे फुटपाथवर निराधार जीवन जगत पायाला झालेल्या जखमेने विव्हळत असलेल्या जिग्नेश याला आपुलकीचा आधार देत त्याच्या पायातील जखमेत झालेले १५ किडे स्वतः काढून जखम स्वछ करून त्यांना जीवन आनंद संस्थेच्या विरार येथील समर्थ आश्रमात दाखल करून घेतले. व जिग्नेश या बंधवाला आधार दिला.

अशाप्रकारे रस्त्यांवरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र काम करणाऱ्या जीवन आनंद संस्थेला समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करणे काळाची गरज आहे.असे संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी यावेळी सांगितले. तरी संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्कॅनरवर अगदी १०० रुपये पासून पुढे कितीही रक्कम मदत म्हणून निराधार बांधवांसाठी पाठवू शकता असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!