वैश्य समाज पतसंस्था संचालकपद निवडणुकीत शिवसेना उबाठा शहरप्रमुख उमेश वाळके विजयी

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था मर्यादित फोंडाघाट च्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालकपदी  शिवसेना उबाठा चे कणकवली शहरप्रमुख उमेश वाळके हे विजयी झाले आहेत. वैश्य समाज पतसंस्था संचालकपदाची निवडणूक 24 डिसेंम्बर रोजी पार पडली. आज सकाळी ओरोस येथे मतमोजणी करण्यात आली.त्यात उमेश वाळके यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार ऍड. दीपक अंधारी यांचा पराभव करत संचालकपदाची निवडणूक जिंकली.

error: Content is protected !!