कणकवली (प्रतिनिधी) : आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर चिरे वाहतूक करणारा ट्रक वागदे वक्रतुंड हॉटेलसमोर पलटी होऊन अपघात झाला.या आघातात ट्रकचालक जखमी झाला असून हायवेवर चिरे पसरून वाहतूक काही काळ खोळंबली होती. ट्रकचेही नुकसान झाले आहे.अपघातस्थळी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, हवालदार वंजारी, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पाटील, पोलीस नाईक बाळू गुरव, महामार्ग वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमी ट्रकचालकाला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वागदेत चिरे भरलेला ट्रक पलटी ; चालक जखमी












