देवगड (प्रतिनीधी) : अनंत कृष्णा केळकर हायस्कूल वाडा शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी निरंजन दीक्षित यांनी नेहमीप्रमाणे शाळेच्या कोणत्याही कामा साठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही याची ग्वाही दिली.संस्थेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी शाळेसाठी एक लाख रुपये ची देणगी देऊ केली.प्रमुख पाहुण्या मंजिरी दीक्षित आणि निरंजन दीक्षित यांनी मुलांना खाऊ वाटप केले तसेच संस्थेबद्दल गौवोद्गार काढले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले त्याचबरोबर संस्थेमध्ये कार्य करणारी सर्व पदाधिकारी हे माजी विद्यार्थी आहेत हे महत्त्वाचे आहे आणि ही परंपरा वैभवशाली परंपरा विद्यार्थ्यांनी जोपासवी आणि आपल्या गावाचा विकास साधावा असे मनोगत व्यक्त केले.शब्दगंध या मुलांच्या हस्तलिखित असे प्रकाशन निरंजन दीक्षित यांच्या हस्ते झाले तर चित्रांगण या चित्रकलेच्या हस्तलिखिताचे उद्घाटन अरुण जोशी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक नारायण माने सर,सूत्रसंचालन विश्वनाथ शिरकर सर,मनोगते शंकर धुरी , सदानंद पवार, शांताराम पुजारी,आभार विकास पवार सर यांनी मानले. कार्यक्रम पार पडण्यासाठी सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक संस्था पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.