माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ग्रामपंचायत किंजवडे यांच्या वतीने नोंदणीकृत लॅब कडून किंजवडे गावाची वायू गुणवत्ता परीक्षण

सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या संकल्पनेतून असा उपक्रम राबवणारी किंजवडे ही जिल्यातील पहिली ग्रामपंचायत

देवगड (प्रतिनीधी) : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वायू तत्वाचा विचार करून देवगड तालुक्यातील किंजवडे गावात एन ए बी एल या नोंदणीकृत लॅब कडून वायू गुणवत्ता परीक्षण करण्यात आले.किंजवडे ग्रामपंचायत, किंजवडे हायस्कुल, घाडी पाडावे वाडी, नवदुर्गा मंदिर, हनुमान मंदिर या सार्वजनिक आणि रहदारीच्या ठिकाणी एन ए बी एल नोंदणीकृत लॅब कडून वायू गुणवत्त्ता परीक्षण करण्यात आले. हवेची गुणवत्ता सह मोजली जाते. थर्मामीटर सारखे काम करते. AQI च्या माध्यमातून हवा किती स्वच्छ किंवा प्रदूषित आहे याचे मोजमाप केले जाते.तसेच हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सूक्ष्म कण आणि ओझोन या वायुंचे प्रमाण मोजले जाते.

AQI हे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. किंजवडे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राखण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरण प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने किंजवडे ग्रामपंचायतच्या वतीने राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. याच दरम्यान ग्रामपंचायत किंजवडे यांचेवतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असताना शाळास्तरावर पाणी बचत,पाण्याचे महत्व,पाणी प्रदूषण याविषयांवर चिञकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने चिञ रेखाटून रंगभरण केले.प्रथम क्रमांक- शुभ्रा प्रदिप परब,द्वितीय क्रमांक – यश मोरेश्वर बगाड ,तृतीय क्रमांक- स्वागत बाबू सुर्वे,उत्तेजनार्थ- सार्थक सचिन ठाकूर अशी निवड करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!