महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत वर्दम यांची बिनविरोध निवड

जिल्हा सरचिटणीस पदी संतोष पालव

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या पंचवार्षिक निवडणूक दिनांक 31/12/2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था कार्यालय ओरोस येथे पार पडली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष पदी कणकवली तालुक्यातील ग्रामसेवक प्रशांत मधुकर वर्दम यांची बिनविरोध निवड झाली. तसेच जिल्हा सरचिटणीस पदी कुडाळ तालुक्यातील ग्रामसेवक संतोष सुधाकर पालव यांची बिनविरोध निवड करणेत आली तसेच उपाध्यक्ष संदिप रमाकांत गवस- सावंतवाडी.. कार्याध्यक्ष श्री प्रसाद विजय ठाकुर – सावंतवाडी, महिला उपाध्यक्ष, श्री रेश्मा गोवळकर, देवगड, कोषाध्यक्ष रविंद्र प्रभुदेसाई.मालवन,सहसचिव,प्रविण नेमण – वेगुर्ला, संघटक उज्वल झरकर- देवगड, महिला संघटक. सुजाता जगताप दोडामार्ग, कायदेविषयक सल्लागार शशिकांत गुरव वैभववाडी यांची निवड करण्यात आली.

या निवडणुक प्रकियेमध्ये पुरूषोत्तम नारायण हरमलकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहीले. या सोबत मावळते जिल्हाध्यक्ष संतोष तुकाराम गावडे, मावळते सरचिटणीस गणेश बागायतकर, ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन अमित दळवी, व्हा चेअरमन नितेश तांबे, मावळते जिल्हा कार्यकारीणी सदस्य मनमोहन धुरी, मंगेश राणे, व सर्व तालुका अध्यक्ष सचिव, व जिल्हयातील बहुसंख्य ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बहुसंख्य ग्रामसेवक व महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष संतोष तुकाराम गावडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा यथोचीत सत्कार जिल्हा संघटनेमार्फत करणेत आला.

error: Content is protected !!