कणकवली (प्रतिनिधी) : अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची विशेष निमंत्रित जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली असून, प्रफुल्ल सुद्रीक यांचा डॉ. अभिनंदन मालंडकर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अजितदादा पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, सुधाकर कर्ले सरचिटणीस, रविंद्र रोगये प्रतिनिधी कासार्डे, भरत गांवकर उपाध्यक्ष युवक काँग्रेस, सागर शिर्के, अमीत गुरव, सुनिल हरमलकर, श्रीकृष्ण घाडीगांवकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..