शेकडो रामभक्त आणि हिंदु धर्माभिमानी सहभागी
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची कलश यात्रेस वेंगुर्लेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी नूतन वर्षी श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघालेल्या यात्रेत श्री राम नामाच्या गजराने वेंगुर्ले शहर परिसर दुमदुमून गेला होता.
सायंकाळी श्री देव रामेश्वर मंदिर येथे श्री देवी सातेरी देवस्थानचे मानकरी सुनील परब,सुधाकर परब यांच्या हस्ते निमंत्रण मंत्राक्षता कलशाचे पूजन करून श्री देव रामेश्वर मंदिर येथून या यात्रेस सुरुवात झाली. यावेळी श्री राम, जय श्री राम. जय श्री राम जय जय श्री राम, राम सियाराम जय जय राम, रघुपती राघव राजाराम, श्री राम जय जय राम,श्री राम नामाचा जयघोष करीत शहरातून मोटारसायकल रॅलीने भव्य शोभयात्रा काढण्यात आली. या यात्रेत श्री देव रामेश्वर देवस्थानचे विश्वस्त दाजी परब, सचिव रवींद्र परब, ब्राम्हण संघटना तालुकाध्यक्ष श्रीकांत रानडे, ब्राम्हण संघटना जिल्हा उपाध्यक्ष अरुण गोगटे,गिरीश फाटक, प्रखंडमंत्री आपा धोंड, सत्संगप्रमुख अजित राऊळ, खजिनदार विनय गरगटे,बजरंग दलचे भूषण पेठे, वासुदेव बर्वे, महेश वेंगुर्लेकर,वसंत तांडेल,दिलीप उर्फ राजन गिरप,प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, सीमा नाईक, मंदाकिनी सामंत, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, डॉ. आनंद बांदेकर,पप्पू परब, हेमंत गावडे, जयराम वायंगणकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, वृंदा गवंडळकर,ऍड.सुषमा प्रभुखानोलकर, हेमा गावस्कर,गौरी मराठे, भूषण सारंग, रामकृष्ण सावंत, पुंडलिक हळदणकर,सातार्डेकर,शैलेश मयेकर, काणेकर, रामकृष्ण सावंत,बाळू प्रभू आदींसह तालुक्यातील रामभक्त हिंदू धर्माभिमानी मंडळी नागरीक्, महिला बहुसंख्येने सहभागी झाले होते.
हि शोभायात्रा रामेश्वर मंदिर कडुन सुरु होऊन गावडेश्वर मंदिर, शिरोडा नाका, कलानगर ,मांडवी, दाभोसवाडा ,जुना एस. टी.स्टॅन्ड,दाभोली नाका , वेंगुर्ले बाजारपेठ, मारुती मंदिर, हॉस्पिटल नाका,भटवाडी पेट्रोल पंप ,आडी स्टाॅप, वरसकर स्टाॅप, संत लालाजी मंदिर मठ मार्गे खांबड भटवाडी, गणपती मंदिर , डाॅन्टस काॅलनी ,गवळीवाडा, पाॅवर हाऊस ,सातेरी मंदिर,राऊळवाडा मार्गे राम मंदिर अशी काढण्यात आली.