अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित वैभव कदम चा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन युवतीला मारण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी वैभव रामचंद्र कदम ( वय 23, रा. हळदीचे नेरूर, ता कुडाळ ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला. आरोपी वैभव कदम याने 19 जानेवारी 2022 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून पीडित युवती गरोदर राहिली. याबाबत अल्पवयीन पीडित युवतीने कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर आरोपी वैभव कदम विरोधात पोक्सो सह बलात्कार व अन्य कलमानुसार 18 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी आरोपीने दाखल केलेल्या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील यांनी पुढील मुद्दे मांडले.आरोपी हा साक्षीदार व फिर्यादिवर दबाव आणण्याची शक्यता आहे.फिर्यादी साक्षीदार याना आमिष दाखवून सत्य हकीकत न्यायालयात सांगण्यास मज्जाव करू शकतो, साक्षीदार, फिर्यादी यांच्या जीवितास धोका पोचवू शकतो, फिर्यादी वर घडलेला अत्याचार पुन्हा करू शकतो.सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी वैभव कदम चा जामीन अर्ज न्यायाधीश जोशी यांनी फेटाळला.

error: Content is protected !!