केंद्रीय मंत्री नारायणराव राणे उद्या कुडाळ मध्ये

भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटनात्मक विषयांवर करणार चर्चा

कुडाळ ( प्रतिनिधी ) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे उद्या गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता भाजपा कार्यालय, कुडाळ येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी नारायणराव राणेसाहेब भाजपा पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन संघटनात्मक विषयांवर चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांची निवेदने देखील स्वीकारणार आहेत. तेव्हा सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे मंडल अध्यक्ष दादा साईल व संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!