श्री भगवती हायस्कुल मुणगेचे ४ जानेवारीला स्नेहसंमेलन

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल व स्व. विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम संस्था कार्याध्यक्ष नारायण सखाराम आडकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी ९.३० वा. रांगोळी चित्रकला हस्तकला प्रदर्शन उद्घाटन, १० वाजता बक्षीस वितरण समारंभ, ११.३० वा. अल्पोपहार आणि सायंकाळी ५.३० ते ८.०० विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन संस्था व प्रशालेच्या वतीने शाळा समिती अध्यक्ष हरी परुळेकर, मुख्याध्यापिका मोनिका कुंज, संस्था व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!