खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेत बालिका दीन देखील साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याद्यापक श्रावणकर यांच्या हस्ते मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर शाळेतील असंख्य मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा सादर केली
.
यावेळी “मी सावित्री बोलतेय” हा एकपात्री अभिनय देखील काही शालेय मुलींनी सादर करून शिक्षक व पालकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी,अलका मोरे,रुपाली पारकर,आरती जेजोन,अमृता ब्रम्हदंडे,अबिदा मुकादम,जेष्ठ शिक्षिका श्रीम स्मिता कोरगावकरसहदेव कोंडविलकर,अंगणवाडी सेविका मोहिरे आदी मान्यवर शिक्षक यावेळी उपस्थित होते. तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.













