कणकवली (प्रतिनिधी) : 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला विद्यामंदिर हायस्कूल लोरे-वाघेरी प्रशालेच्या पटांगणावर लोरे पंचक्रोशीतील माता भगिनींसाठी, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सिने अभिनेता सचिन श्रीधर यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदनाद्वारे व मनोरंजनात्मक छोट्या-छोट्या खेळांद्वारे उपस्थितांमधे हास्य फुलविले. यातूनच मानाची पैठणी जिंकण्याची स्पर्धा रंगत गेली. तर लहान मुलांसाठी खेळ घेऊन धमाल मजा करण्यात आली. परीक्षक म्हणून स्नेहलता रावराणे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्यास उत्कृष्ट भूमिका निभावली.
उत्तरोत्तर बहरत जात खेळ पैठणीचा या कार्यक्रमात समीक्षा संतोष मोसमकर या मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या.मनोज रावराणे यांनी एक सामाजिक भावना जपत या कार्यक्रमाचे आयोजन करणे आपला मित्रपरिवार, ग्रामस्थ व माता-भगिनी यांच्या प्रेमामुळे व आशीर्वादामुळे शक्य असल्याचे म्हटले.उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. आकर्षक फटाक्यांच्या आतिषबाजीने नवंवर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.












